Latest Marathi News

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

सुधा बोडरे – पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने वेळोवेळी २१ लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वडगाव बुद्रुक येथील एका नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. २६२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल सतीश कुलकर्णी (रा. उल्हास सोसायटी, सहकारनगर नं. २) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ जुलै २०१४ ते १ डिसेबर २०२३ दरम्यान घडला.
        याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाला महापालिकेत नोकरी लावून देतो, असे आरोपीने आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये चेक स्वरुपात व १३ लाख ५० हजार रुपये रोख स्वरुपात वेळोवेळी घेतले. भावाला नोकरी लावण्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच घेतलेले पैसे परत केले नाहीत. आरोपी राहुल कुलकर्णी याने सिक्युरिटी म्हणून दिलेले त्याच्या बँकेचे चेक देखील बँकेत भरुन न देता फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर  तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!