मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता १२ ऑगस्टला होणार आहे. पण या अगोदर झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांना बाजू मांडण्यात अपयश आले होते.त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णयाची घाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आयोगाकडील सुनावणीबाबतही चित्र अस्पष्ट आहे.पण या सत्तासंघर्षात जर शिंदे गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली तर काय भूमिका घ्यायची? यावर शिंदे गटातील आमदार संभ्रमात आहेत. गटातील १५ आमदारांनी भाजपमध्ये विलिनीकरणास थेट विरोध दर्शविला आहे. शिंदे गटातील एक ज्येष्ठ नेत्याच्या घरी या आमदारांनी एकत्र येत भाजपात विलीनीकरण नको असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सह भाजपामध्येही अस्वस्थता पसरली आहे.
आधीच लांबत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. पण निकालही विरोधात जाण्याची शक्यता असल्यामुळे शिंदे गट फुटू नये यासाठी एकनाथ शिंदे सह भाजपामधील वरिष्ठ नेते प्रयत्न करताना दिसत आहे.