Just another WordPress site

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

पावसाळी अधिवेशनाचेही बिगुल वाजणार

मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- राज्यात मागील दीड महिन्यापासून दोनच मंत्री कारभार पाहत आहेत. फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी होऊन आता महिना उलटून गेला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.पण आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खात्रीलसयक माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी अकरा वाजता होणार असून पावसाळी अधिवेशनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

GIF Advt

अधिवेशन १० ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बुधवारपासून विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.मोहरमची शासकीय सुट्टी रद्द करून विधिमंडळाचं कामकाज सुरू राहणार असल्याचंही सांगण्यात आले आहे. मंगळवारी ११ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, त्यानंतर तीन वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे. आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!