सावधान! तुमच्या जवळ दोन हजाराची नोट आहे का? ही बातमी वाचा
देशात पुन्हा एकदा नोटबंदी, दोन हजाराच्या नोटा बंद, या तारखेपर्यंत घ्या बदलून
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- नरेंद्र मोदी सरकारने २०१६ साली केलेली नोटबंदी फायद्याची कि तोट्याची यावर अजूनही चर्चा होत असताना, आरबीआयने आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने २ हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, २ हजार रुपयांची नोट मागे घेतली जाणार आहे. परंतु नोटांची यापुढे छापाई बंद केलाी जाणार आहे. ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. याआधी ९ नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आश्चर्याचा धक्का देत देशात नोटबंदीची घोषणा केली होती. याअंतर्गत १ हजार आणि ५०० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बाजारात पुन्हा ५०० रुपयाची नवी नोट आणण्यात आली, मात्र १ हजार रुपयांच्या जागी २ हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती. एकावेळी फक्त २ हजार रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या ३५४२९.९१ कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर २०१७-१८ मध्ये अत्यंत कमी १११५.०७ कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन २०१८-१९ मध्ये केवळ ४६६.९० कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र छपाई बंद करण्यात आली होती.
गेल्या काही महिन्यांपासून बाजारात २००० रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून २००० रुपयांच्या नोटाही बाहेर येत नसल्याचे लोक सांगत होते. त्याचबरोबर संसदेत १ ऑगस्ट २०२२ रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की एनसीआरबी डेटानुसार, २०१६ ते २०२० दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २२७२ वरुन २४४८३४ वर पोहोचल्याचे सांगितले होते.