पाकिस्तान दि ११ (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शेजारील देशांमध्ये महागाईमुळे जनता सरकारच्या विरोधात उतरली होती. श्रीलंकेनंतर पाकिस्तानमध्येही जनतेत मोठ्या प्रमाणात महागाईच्या
मुद्यावर सरकार विरोधात नाराजी दिसत आहे. अशातच महागाईने त्रासलेल्या आईचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानातील एका महिलेने पाकिस्तानची आर्थिक स्थिती उघड केली आहे. या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.महिलेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही जाब विचारला आहे.बऱ्याच वेळापासून पाकिस्तान आर्थिक संकट आणि महागाईखाली दबलेला आहे. त्यामुळे गृहिणी आता महागाईवर बोलताना दिसत आहेत. शाहबाज शरीफ आणि मरियमसारख्या लोकांनी वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर आपला खर्च कसा भागवायचा हे सांगावे. मी माझ्या मुलांना खायला घालायचे की त्यांना मारुन टाकायचे? असा सवाल केला आहे. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तनामध्येही महागाईच्या मुद्दावरुन नवीन सरकार सत्तेवर आलं आहे. मात्र अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही.
या महिलेच्या एका मुलाला फीट येते आणि त्याच्या उपचारासाठीच्या औषधांचा खर्च गेल्या चार महिन्यांत वाढला आहे. “मी माझ्या मुलासाठी औषधे खरेदी करणे टाळू शकतो का? सरकारला देवाची भीती वाटत नाही का?” असा सवालही या महिलेने विचारला आहे.