लातूर – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बास्केटबॉलची मॅच पाहणे एका चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे.
ही मुलगी लॉजच्या खिडकीमध्ये बसून बास्केटबॉलची मॅच पाहत होती. यादरम्यान तिचा अचानक तोल गेला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली, मात्र खाली पडताना ती विजेच्या तारेवर कोसळली आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अद्या देशपांडे असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ती ११ वर्षांची होती. मूळची ती हैदराबादची रहिवाशी होती.
काय घडले नेमके?
अद्या आपल्या मावशीसोबत लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर त्या दोघी लॉजवर आल्या. लॉजवर आल्यानंतर अद्या खिडकीतून बाहेर पाहत होती. या लॉजच्या शेजारीच जिल्हा परिषदेचं ग्राऊंड आहे, त्या ग्राऊंडवर बास्केटबॉलची मॅच सुरु होती. तिला ती मॅच पाहण्याची इच्छा झाली. त्यामुळे ती खिडकीजवळ जाऊन बसली होती. खिडकी लॉक आहे निघणार नाही या विश्वासावर ती खिडकीला टेकून बसली होती. मात्र अचानक खिडकी उघडली गेली. त्यामुळे अद्याचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. याच खिडकीच्या खालून विजेची तार गेली गेली आहे. आधी ती त्या तारेवर पडली नंतर खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत अद्याचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंब लातूरकडे रवाना
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच अद्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ते तातडीने हैदराबादकडून लातूरला निघाले