शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार?
'त्या' ट्विटमुळे राजकीय चर्चेला उधान, शिंदे गटातील वाद समोर
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील नाराजी थांबताना दिसत नसून नाराज आमदार पुन्हा एकदा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे अशातच शिंदे गटात सामील झालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून केला. यासोबत त्यांनी ठाकरेंचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओही जोडला. या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे आता शिंदे गटात फूट पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने संजय सिरसाट पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार की काय? अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. शिरसट यांनी ते ट्विट नंतर डिलीट केले. शिरसट असे ट्विट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देत दबावाचे राजकारण करत आहेत का अशीही चर्चा रंगली आहे. या ट्विट बद्दल बोलताना शिरसाट म्हणाले की, “आम्ही आजही शिवसेनेत आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आम्ही उद्धव ठाकरे यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. आज जरी आमचे भांडण जरी झालं असलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. आम्ही दूर जरी झालो असलो तरी ते आमचे कुटुंबप्रमुख होतेच. असे मत मांडले आहे. त्यामुळे शिरसाट नाराजांची एकी करत परत मातोश्रीवर जाणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील वाद उघड झाले आहेत काल बच्चू कडु आणि आता संजय शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने नाराज आमदारांचा एक गट पुन्हा एकदा मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष ताब्यात घेण्याची तयारी सुरु असताना आमदारांची नाराजी ते कशी रोळणारे हे पहावं लागेल