Latest Marathi News
Ganesh J GIF

शिरसाट नंतर शिंदे गटातील ‘हा’ आमदार नाराज?

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात यावेळेस स्थान मिळालेले नसले तरी विधिमंडळ अधिवेशनानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिलं नाव हे माझेच असेल असा विश्वास शिंदे गटाचे विधिमंडळातील पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिंदे गटात नेमक चाललय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोगावलेही मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत.

महाडचे आमदार भरत गोगावले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांचे नावही चर्चेत होते. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी झालेल्या बैठकीत त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचे नाव वगळण्यात आले. यावर बोलताना गोगावले म्हणाले की,”राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. आज मंत्रिमंडळात समावेश झालेला नसला तरी पुढील मंत्रिमंडळ विस्तारात माझे नाव पहिलेच असेल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढील मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल त्यात माझ्यासह आणखीन काही सहकाऱ्यांचा समावेश असेल. रायगडचा पालकमंत्री मीच होईन. जिल्ह्यातील भाजप आमदारांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे त्यांनी शिंदेनाही एक प्रकारे इशारा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज नसल्याचे स्पष्टीकरणही देताना गोगावले यांनी पुढच्या यादीत मला संधी भेटेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रायगडच्या एकाही आमदाराला स्थान मिळू शकले नाही़ त्यामुळे रायगडमधून नाराजीचा सूर होता़. पण शिंदे गटाला १० ते १५ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. पण इच्छुकांची संख्या जास्त असल्याने शिंदे गटात आलबेल नसल्याचे चित्र आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!