मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.पंकजा मुंडे याही या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी पंकजा यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.
कार्यक्रमात सुत्रसंचालक सुबोधने पंकजा मुंडेंना विचारले की, ‘तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडलेत का?’ यावर पंकजा ताई गौप्यस्फोट करत म्हणाला, ‘होय.. मी आमदार फोडले आहेत.’ त्यावर सुबोधने कधी?.. असा प्रतिप्रश्न केल्यावर ‘सगळंच सांगत बसले तर एक वेगळा भाग आपल्याला शूट करावा लागेल. पण अनेक लोकांनी आज आमच्याकडे म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या बीड जिल्ह्यात कित्येक राष्ट्रवादी, कॉँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आमच्याकडे आले आहेत.’ असे पंकजा म्हणाल्या आहेत. तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना पंकजा हसत म्हणाल्या, ‘अजिबात नाही. तो सुखद क्षण मला अनुभवताच आला नाही.’ असे सांगताना गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असल्यामुळे माझ्याबरोबर सुरक्षारक्षक असायचे त्यामुळे ते सुख राहीले अस मुंडे म्हणाल्या.यावेळी डायलाॅगबाजी देखील पंकजा मुंडे यांनी केली आहे.
राजकारणात आले तेव्हा माझ्या वडिलांनी एकच गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे कायम बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं नाही. जर आपल्याकडे बेरीज होत असेल तर काही हरकत नाही. कारण राजकारणात आणि युद्धात जिंकणं महत्वाचं असतं अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली आहे.