Latest Marathi News
Ganesh J GIF

नवज्योत सिमी ठरल्या देशातील सर्वात सुंदर आयपीएस अधिकारी

वर्दीतली सौंदर्यवती म्हणुन ओळख, एसपी पदावर मिळाली बढती, इंस्टावर लाखो फॉलोअर्स

दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- अनेकांचे स्वप्न यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी बनन्याचे असते. अर्थात ती परीक्षा सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यामुळे काही निवडकच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होतात. या उमेदवारांनी उत्तीर्ण होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतलेली असते. पण अशी एक तरुणी अधिकारी बनली आहे. ती आपल्या कामाबरोबर साैंदर्यामुळे जास्त चर्चेत असते.

बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी नवज्योत सिमी यांनी खरे तर सुरूवातीला डाॅक्टरचे शिक्षण घेतले होते. पण त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०१६ साली त्यांनी पहिल्यांदा युपीएसीची परीक्षा दिली. पण त्यात त्यांना अपयश आले. पण तरीही त्यांनी हार न मानता पुन्हा तयारी सुरू केली. आणि २०१७ साली त्या देशात ७३५ व्या क्रमांकाने उतीर्ण होत यश मिळवले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांना एसपी पदावर बढती मिळाली आहे. त्यांचे पती तुषार जे आयपीएस तुषार आहेत, त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सिमीचे अभिनंदन केले आहे. नवज्योत यांनी तुषार सिंगला यांच्याशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न केले होते. विशेष म्हणजे सिमी सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे ७.५ लाख फॉलोअर्स आहेत.


देशातील सर्वाधिक चर्चित महिला पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नवजोत सिमी यांचे नाव घेतले जाते. आत्तापर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत. त्यांना वर्दीतली सौंदर्यवती म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या प्रत्येक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत असते. आता त्यांना बढती मिळाल्याने पुन्हा चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!