Latest Marathi News
Ganesh J GIF

भारतीय चित्रपट केवळ असतात केवळ हिप्स आणि…

अभिनेत्रीचे खळबळजनक विधान, नेटकरी संतापले, अभिनेत्री ट्रोल, व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बॉलिवूड हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तीने भारतीय सिनेसृष्टीबद्दल बोलताना दिसत आहे. अलीकडे प्रियंका बाॅलीवूडमधील अनेक काळ्या बाजू उघडताना दिसत आहे. आताही तिने एक खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे.

प्रियंकाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियंकाचा हा जुना व्हिडीओ पाहून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत. प्रियंका एका ठिकाणी म्हणाली होती की, भारतीय चित्रपट केवळ हिप्स आणि बूब्बबद्दल असतात. तिला डान्स स्टेप करण्याविषयी विचारले असता तिने हे उत्तर दिले होते. आता तिचा हा जुना व्हिडीओ खूप व्हायरल होत असून तिच्या या वक्तव्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त करत आहेत. “बॉलीवूडने तिला ओळख दिली आहे आणि ती त्याचबद्दल असं बोलत आहे, असं नेटकरी म्हणू लागले आहेत. ६८ व्या एमी पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!