काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?
मुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा करत प्रवेशाचा निर्णय
सांगली दि १३ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दाै-यावर होते यावेळी त्यांची काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी भेट घेतली. पण यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने विश्वजीत कदम शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. जर तसे झाले तर राज्याच्या राजकारणातील तो दुसरा भूकंप ठरणार आहे.
विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्यातील पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.त्यांचे वडील पतंगराव कदम हे काँग्रेसचे मोठे नेते होते. या भागात कदम यांचे वर्चस्व कायम आहे.त्यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाने सांगलीचे राजकारण देखील बदलू शकते. त्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहणार की शिंदे गटात जाणार याचीच चर्चा सांगलीमध्ये रंगली आहे. मध्यंतरी काँग्रेसचा एका गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.त्यांची आणि शिंदे यांची गोव्यात भेट झाल्याची देखील बातमी आली होती. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावाला दांडी मारून काँग्रेसच्या आमदारांनी भाजपाला मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे कदम यांची भेट त्यासाठी तर नव्हती ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पतंगरावांच्या कार्यामुळे काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांचा आणि सांगली जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा विश्वजीत कदम यांना पाठिंबा आहे. पण विश्वजीत कदम यांनी वेगळा मार्ग निवळला म्हणजे शिंदे गटाची साथ धरली तर काँग्रेसचे त्यांचे कार्यकर्तेदेखील शिंदे गटात सामील होतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय.