Latest Marathi News

जळगावात ‘सैराट’, पोलिसही हादरले

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने केली बहिणीची हत्या

जळगाव दि १३ (प्रतिनिधी)- बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण नुकताच साजरा झाला. या सणानंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात एक सैराट घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून सख्या भावानेच बहिणीसह तिच्या प्रियकराचा खून केला आहे. या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वर्षा समाधान कोळी आणि राकेश संजय राजपूत अशी हत्या झालेल्यांची नाव आहेत. यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. मुलीच्या भावाने हे खूूून केेले. रात्री उशिरा १७ वर्षीय अल्पवयीन भाऊ स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाला. सध्या पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. राकेश याचे वर्षावर प्रेम होते. हे दोघे पळून जाणार होते. याबाबतची माहिती वर्षाच्या लहान भावाला समजली. त्याने बहिणीवर लक्ष ठेवले. राकेश हा वर्षा हिच्या घरी आला असता, लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश आणि वर्षा या दोघांना दुचाकीवर बसवून चोपडा ते वराडे रोडलगतच्या नाल्याजवळ आणले. त्यानंतर राकेशच्या डोक्यात गोळी झाडून तर बहिण वर्षाचा गळा दाबून खून केला.

पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. संशयित अल्पवयीन भावानेच दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!