अभिमानास्पद! चांद्रयान-३ अवकाशात झेपावले
देशभरात जल्लोष, इस्रोचे अभिनंदन, आॅगस्टमध्ये चंद्रावर लँडिंग, एैतिहासिक कामगिरी करणारा भारत कितवा देश
श्रीहरीकोटा दि १४(प्रतिनिधी)- देशासह जगभराचे डोळे लागलेल्या भारतातील चांद्रयानने यशस्वी उड्डान केले आहे. दुपारी २.३५ मिनिटांनी यान अवकाशात झेपावले तसेच सर्व देशभरात जल्लोष करण्यात आला. त्याचबरोबर एक एक टप्पा यशस्वी पार करत यान अवकाशाच्या कक्षेत पोहोचले आहे. त्यानंतर इस्त्रोने मिशन यशस्वी झाल्याची घोषणा केली.
चांद्रयान 3 ने आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर मधून शुक्रवारी दुपारी २:३५ वाजता अवकाशात झेप घेतली. चांद्रयान 3 च्या चंद्रापर्यंतच्या प्रवासाला ४० दिवस लागणार आहेत. चांद्रयानाचे २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडिंग अपेक्षित आहे. सुरुवातीचे काही दिवस यान पृथ्वीच्या भोवती फिरणार आहे. त्यानंतर ते चंद्राकडे झेपवणार आहे. चांद्रयान ३ ही भारताची तिसरी चंद्र मोहीम आहे. या मोहिमेनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर चौथा देश बनेल. याआधी चांद्रयान २ मिशनमध्ये २०१९ साली चंद्रावर उतरत असताना यानाचा बिघाड झाला होता. आणि यानाशी असणारा संपर्क तुटला होता. चांद्रयान-३ मोहिमेमध्ये स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोव्हर या तीन घटकांचा समावेश आहे. भारतात चंद्र मोहिमेची घोषणा २००३ मध्ये करण्यात आली होती. पण चंद्रावर पहिले यान २००८ मध्ये पाठवण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे चांद्रयान-३ मोहिमेचं नेतृत्व रितू कारिधाल यांनी केले आहे. ज्यांना ‘रॉकेट वुमन’ म्हणून संबोधले जात आहे. सध्या देशभरातून इस्त्रोचे अभिनंदन केले जात आहे.
चंद्रयान तीनबद्दल बोलयाचे झाल्यास ६४० टन वजनाच्या या यानात ८ हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे. ‘चांद्रयान-३’मोहिमेच्या माध्यमातून थेट चंद्रावर रोव्हर उतरवून तिथल्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. चांद्रयान ३ चे एकूण बजेट ६१५ कोटी रुपये आहे. यानुसार भारताच्या या चांद्रयान मोहिमेसाठी प्रति किलोमीटर ६००० रुपये खर्च झाला आहे. जो की आजवरचा सर्वात कमी खर्च असणार आहे.