ग्रामीण पत्रकारांनी आधुनिकतेचा हात धरून पत्रकारिता करावी- विलास बडे पत्रकार news 18 लोकमत
प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याचे उद्घाटन
पुणे दि २६(प्रतिनिधी)- लोणी काळभोर येथील राजकपूर सभागृह एम आय टी विद्यापीठ येथे महाराष्ट्रातील शेकडो पत्रकारांच्या उपस्थितीत प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याचे उद्घाटन पार पडले.यावेळी दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच news 18 लोकमत पत्रकार विलास बडे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील पत्रकारांची आर्थिक अवस्था सध्या वाईट असून माध्यमांच्या बदलत्या स्वरूपानुसार त्यांनी देखील स्वतः बदलणे गरजेचे आहे तेव्हाच या स्पर्धेत ते तग धरू शकतील.त्याचसोबत खऱ्या अर्थाने पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम सध्या फक्त ग्रामीण पत्रकारच करत असून पत्रकारांच्या विकासासाठी नव्याने सुरू झालेल्या प्रिंट व डिजिटल पत्रकार संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून झालेल्या मदतीचा आढावा देत पत्रकारांच्या आरोग्याचे प्रश्न मांडले व सहायता कक्षाच्या माध्यमातून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन सर्व पत्रकारांना दिले.प्रिंट व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांना त्यांनी राज्यभरात केलेल्या आरोग्य संदर्भातील कार्याबद्दल आरोग्यदूत हा पुरस्कार संघाचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दल पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी शिवाजी ननवरे यांना असामान्य कर्तुत्व हा पुरस्कार मंगेश चिवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थितांमध्ये शिरूर हवेली आमदार अशोक पवार,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,कृषी उत्पन्न बाजार समिती मा.उपसभापती अनिल टिळेकर,जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण काळभोर,थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे,शिवसेना नेते मुंबई रामदास शेवाळे,सातारा जिल्हा अध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन हवेली तालुका अध्यक्ष संदीप बोडखे यांनी केले.
प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्या पुणे प्राईम न्यूज या दैनिकाचे अनावरण news 18 लोकमतचे पत्रकार विलास बडे यांच्या हस्ते करण्यात आले.न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास अल्पावधीतच लाखो वाचकांच्या पसंतीस पडल्याने संघाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून या दैनिकाचे अनावरण करण्यात आले.