Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांनी केली जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी – ATS ची माहिती

पुणे – कोथरुड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने  (ATS) दिली आहे.  एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर करवाया प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढवण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना मंगळवारी (दि.२५ ) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस.व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी  (वय -२४ ), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान  (वय-२३ , दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा- मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) असे पकडण्यात आलेल्या दोन दहशवाद्यांची नावे आहेत. मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१ ) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा , कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!