भाजपा खासदाराचा भाऊ घेणार तिसऱ्यांदा घटस्फोट?
माॅडेल पत्नीला देणार घटस्फोट, वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत, वडील होते मोठे नेते, नक्की काय बिनसले?
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांचे बंधु आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राहुलचे तिसऱ्यांदा लग्न मोडले असून तो पत्नी नताल्या इलीनासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नाच्या चार वर्षानंतर राहुल आणि नताल्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप नेते प्रमोद महाजन यांचे पुत्र असलेले राहूल महाजन कायमच वादात असतात. अनेक इंग्रजी आणि हिंदी वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. राहुल आणि नताल्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते. सुरुवातीपासून दोघांमध्ये अनेक वाद होते. परंतु लग्न झालं असल्याने ते गप्प होते. परंतु गेल्या वर्षी ते वेगळे झाले आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या जोडप्याने गेल्या वर्षी कागदपत्रे दाखल केली होती, घटस्फोट झाला आहे की अद्याप प्रक्रिया सुरू आहे हे मात्र स्पष्ट नाही. घटस्फोटाच्या बातमीबाबत राहुलने नकार दर्शवला नाही किंवा त्याची पुष्टीही केली नाही. मला माझे खाजगी आयुष्य खाजगीच ठेवायचे आहे, असे म्हणत राहुलने यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. नताल्याने याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. यापूर्वी राहूलची दोन लग्नं झाली होती, मात्र काही वर्षांतच त्याचा संसार मोडला होता. एन लग्न तर त्याने एका रिअॅलिटी शोमध्येच केले होते. दरम्यान नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी आहे. त्या दोघांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. काही दिवसापूर्वीच त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली होती.
नताल्या ही राहुलची तिसरी पत्वी आहे. यापूर्वी त्याचे पहिले लग्न श्वेता सिंह हिच्याशी झाले, ते दोघं २००६-२००८ पर्यंत एकत्र होते. नंतर ते वेगळे झाले. नंतर ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ या रिॲलिटी शो मध्ये त्याची ओळख डिंपी गांगुली हिच्याशी झाली. २०१० साली त्यांनी लग्न केलं, मात्र २०१५ त्यांचा घटस्फोट झाला होता. तिने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला होता.