पुणे दि १७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मिडीयावर चांगलेच सक्रिय असतात. पण सोशल मिडीयावर त्यांचे सक्रिय असणे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांना आवाहन केल आहे. पाहूया नेमक अमोल कोल्हेंच्या बाबतीत काय झालयं.
अमोल कोल्हे यांच्या नावे कुणीतरी इनस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर पोस्ट लिहित खुलासा केला आहे. कोल्हे यांच्या नावे खोटे सोशल मीडिया अकाऊंट तयार करून लोकांची फसवणूक केली जात आहे. या व्यक्तीने अगदी अमोल कोल्हे यांच्या प्रोफाईल फोटो असणार फोटो फेक अकाऊंटच्या प्रोफाईला ठेवला आहे. संबंधित व्यक्ती अमोल कोल्हे यांच्या नावाने लोकांकडे पैसे मागत आहे. हा प्रकार समोर येताच अमोल कोल्हे यांनी या प्रकाराचे स्क्रीनशॉट शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असून त्यातून जनतेची फसवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोस्ट करत सावध राहण्याच आवाहन केल आहे.
अलीकडे सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नेते, अभिनेते यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून पैसे मागण्याचा प्रकार वारंवार उघडकीस आला आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर सावधपुर्वक करण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.