Latest Marathi News

‘आले रे आले गद्दार आले’

विरोधकांची घोषणाबाजी, शंभुराजेंची आँफर

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवसाची सुरूवातच मोठी वादळी झाली आहे. अधिवेशनापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलनास केले.‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले’ अशा घोषणाबाजी करत विरोधकांनी शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला .
पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शिंदे सरकारला धारेवर धरले. अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवरच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे सरकार हे ईडी सरकार म्हणत निषेध केला आहे. ‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले, ईडी सरकार हाय हाय…, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो, धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा देत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंसमोरच ही घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी शंभुराजेंनी तुम्हालाही पाहिजे का? अस म्हणत विरोधकांना एकप्रकारे आँफरच दिली आहे.

विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर एकजूट दाखवली आहे.त्यामुळे हे अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच काँग्रसेचे छगन भुजबळ, एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, अंबादास दानवे सहभागी झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!