पुण्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी
दोन गटातील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, लहान मुले, महिला जखमी, गणेश विसर्जनाला वादाचे गालबोट
पुणे दि २९(प्रतिनिधी)- गणरायाला काल वाजतगाजत निरोप देण्यात आला. पण हे सर्व होत असताना पुण्यात मात्र वादाचे गालबोट लागले आहे. पुण्यातील सहकार नगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत.
पुण्यात काल गणपती विसर्जनाचा वेगळाच उत्साह होता. सार्वजनिक मंडळाबरोबरच घरगुती गणपतीला निरोप देण्यात आला. पण यावेळी सहकारनगर भागात वादाचे गालबोट लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर भागात ही घटना घडली आहे. सहकारनगर भागात या भागात शेंडी आणि सुर्या टोळ्या आहेत. विसर्जनादिवशी त्यांच्यात जुन्या कारणामुळे वाद झाला. अखेर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामध्ये दोन्ही गट एकमेकांना लाठ्या-काठ्या, दगड-विटा यांनी मारहाण करु लागला. यात दोन्ही बाजूच्या तरुणांबरोबरच महिला आणि लहान मुलेही जखमी झाले आहेत. दोन्ही टोळीत विसर्जनाच्या ठिकाणी वाद झाला. त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असल्याने नाहक महिला आणि लहान मुले जखमी झाली आहेत. दरम्यान या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. भर रस्त्यावर हा राडा सुरू होता. त्यामुळे काही काळ परिसरात घबराट पसरली होती.
या घटनेनंतर काही वेळानंतर दोन्ही गट घटनास्थळावरून निघून गेले. त्यानंतर वाद निवळला. दरम्यान सहकार नगर पोलिसांनी या प्रकरणी किती जणांवर गुन्हा दाखल केला? ही माहिती समोर आली नाही.