भास्कर जाधव का म्हणाले ‘नितेश राणेंना काहीतरी शिकवा’
भास्कर जाधव नितेश राणेंचा कोणत्या मुद्द्यावर वाद
मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना शिवेसना नेते भास्कर जाधव यांनी चांगलंच खडसावले आहे. मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, म्हणत नितेश राणे यांना गप्प बसण्याची सूचना केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली पहायला मिळाली.
मुंबई गोवा महामार्ग बारा वर्षे रखडला आहे. तो केव्हा पूर्ण होणार यावर कोकणातील आमदार मंत्री रवीद्र चव्हाण यांना प्रश्न विचारत होते.यावेळी भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी अडीच वर्षे वाया गेली असा शेरा मारल्याने जाधव यांनी त्यांना चांगलेच खडसावले. यावेळी मी प्रश्न विचारून थकलो आहे. तुमचे अधिकारी मात्र तेच तेच उत्तरे देत आहेत. २०२३ हा आकडा कायम आहे. असे मुद्दे मांडत असताना मध्येच नितेश राणे बोलले. त्यावर मला तुम्हाला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारला विचारतो, असे भास्कर जाधव म्हणाले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. मी मंत्र्यांशीच बोलत आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना काहीतरी शिकवा, अशी भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना विनंती केली. त्यामुळे सभापती राहुल नार्वेकर यांना हस्तक्षेप करावा लागला. याआधीही या दोन नेत्यांमध्ये अनेकवेळा वाद झालेला पाहायला मिळाला होता.
सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरल आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शिंदे फडणवीस सरकार बॅकफुटवर आल्याचे पहायला मिळत आहे.