Just another WordPress site

‘त्या’ बोटीचे ऑस्ट्रेलियन कनेक्शन समोर

देवेंद्र फडणवीसांनी दिली 'ही' माहिती

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये २ ते ३ एके-४७ आढळली आहेत. रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. ही बोट ऑस्ट्रेलियामधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या हाना लॉंडर्न्स गन यांच्या मालकीची आहे. लेडी हार्न असे या बोटीचे नाव आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. पण या घटनेने कोकणात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बोटीबद्दल माहिती देताना फडणवीस म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर मच्छिमारांना संशयास्पद बोट आढळली. त्यांनी स्थानिक पोलिसांना या बोटीच्या संदर्भात माहिती दिली. या बोटीची पोलिसांनी तपासणी केली असून त्यामध्ये २ ते ३ एके-४७ रायफल, दारुगोळा आणि बोटी संदर्भातील कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेमुळे किनारपट्टीवर नाकाबंदी करत रायगड जिल्ह्याला हायअलर्टचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. या बोटीचे नाव लेडी हार्न आहे.ही बोट ऑस्ट्रेलियाच्या हाना लॉंडर्न्स गन यांच्या मालकीची आहे. या ऑस्ट्रेलियन महिलेचे पती जेम्स हार्बट या बोटीचे कॅप्टन आहेत. ही बोट मस्कतहून युरोपच्या दिशेने जात होती. पण बोटीचे इंजिन खराब झाल्याने खलाश्यांनी मदतीसाठी संपर्क साधला. त्यांची कोरीयन युद्ध नौकेने सुटका केली. त्यांनतर त्यांना ओमानला सुपूर्द केले”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

GIF Advt

समुद्रकिनारी बोट सापडल्याने महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले होते कारण २६ नोव्हेंबरचा हल्ला करणारे दहशतवादी बोटीच्या साह्यानेच मुंबईत आले होते. त्यामुळे सतर्कतेचे आदेश दिले होते. सध्या पोलीसांनी सावधगिरी बाळगत सतर्कतेचे आदेश दिले आहेत. विधानसभेतही या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!