अभिनेत्री माजी महिला खासदाराविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी
अभिनेत्रीच्या अडचणी वाढणार, पराभवानंतरही अडचणी वाढणार?, नेमके प्रकरण काय?
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्याविरोधातील अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण रामपूर न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. लोकसभा निवडणुक दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. खासदार जया प्रदा यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता १७ नोव्हेंबरला होणार आहे.
जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकिटावर रामपूरमधून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. पण या निवडणूकीत जयाप्रदा यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी १९ एप्रिल रोजी नूरपूर गावात रस्त्याचे उद्घाटन केले होते. कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होताच जया प्रदा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केल्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणाची सुनावणी रामपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात सुरु आहे. साक्ष प्रक्रियेनंतर जयाप्रदा यांना न्यायालयात त्यांचं म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. बुधवारी देखील त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. पण जया प्रदा न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे जयाप्रदा यांच्याविरोधात न्यायालायने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होणार आहे. जयाप्रदा या समाजवादी पार्टीतून दोन वेळा खासदार झाल्या होत्या. उत्तर प्रदेशातील रामपूर येथून त्या दोनदा निवडून आल्या होत्या.
जया प्रदा यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता न्यायालय यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्याशी मतभेद झाल्यामुळे जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्या आरएलडीमध्ये सामिल झाल्या होत्या. पण २०१९ लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.