सावंतवाडी प्रतिनिधी : गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल भरावा लागणार असून हे टोल नाके गोव्याच्या एन्ट्री पाॅईट म्हणजेच पत्रादेवी व कोळे या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.तसा प्रस्ताव गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला आहे.मंत्री गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत.एन्ट्री पाॅईटवरच टोलनाके उभारू शहरीभागात नको अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मात्र हे टोलनाके कधी बसविण्यात येणार तसेच कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार याची अद्याप निश्चीती झाली नाही. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यातील रस्ते महामार्गाच्या प्रकल्पाबाबत गोवा येथे बैठक पार पडली या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंग,केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते महामार्ग प्रकल्पावरून अधिकारी व ठेकेदार यांची चांगलीच झाडाझडती घेतली जे अपूर्ण प्रकल्प आहेत ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली असून निधीची कुठे ही कमतरता भासणार नसल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुंबई गोवा महामार्गा बाबत त्यांनी या बैठकीत आढावा घेत अधिकाऱ्यांना काहि सूचना केल्या कामे थांबवू नका वेळेत कामे पूर्ण झाली पाहिजेत असा कडक इशारा त्यांनी दिला.
दरम्यान मोपा विमानतळाला जोडला जाणारा महामार्ग फेब्रुवारी अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत मंत्री गडकरी यांनी दिल्या असून कामाबाबत ही समाधान व्यक्त केले.तर पत्रादेवी ते काणकोण पर्यंतच्या रस्त्या मध्ये काहि ठिकाणी महामार्गाचे काम थांबले आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करा असे सांगितले तसेच गोव्याच्या दोन्ही एन्ट्री पाॅईट वर टोल नाके उभारण्याचे ही या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दोन एन्ट्री पाॅईट वर टोल नाके उभारण्याची सूचना केली.त्यात महाराष्ट्र तून एन्ट्री करतना पत्रादेवी तर कर्नाटक मधून येतना कोळे या दोन ठिकाणी हे टोल नाके असणार आहेत मात्र शहरी भागात टोलनाके उभारण्यास मंत्री गडकरी यांनी असमर्थता दर्शवली असून एन्ट्रीला टोल नाके उभारण्यास तत्वता मान्यता दिली आहे.