
वर्धा दि २१ (प्रतिनिधी)- सासुरवाडीच्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात दारुत विषप्रयोग करुन साडुने साडूची हत्या केल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यात समोर आला आहे. सेलू तालुक्यातील जुनगड येथील पिंपळेमठ परिसरात ही घटना घडली होती. पण पोलीसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे.
मोरेश्वर मारोतराव पिंपळे असे मृताचे नाव आहे.तर संदीप पिंपळे, विजयसिंह चितोडीया, राजकुमार चितोडीया यांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार. सासऱ्याच्या असलेल्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन साडू साडूत वाद होता. त्यामुळे संदीपणे मोरेश्वरच्या दारूत जडीबुटी म्हणून विष मिसळले. याकामी त्याला विजयसिंह चितोडीया आणि राजकुमार चितोडीया यांनी मदत केली. अखेर विष मिसळलेली दारू पिल्याने मोरेश्वरचा मृत्यू झाला. मोरेश्वरचा मृत्यू झाल्यावरही आरोपी संदीप हा त्याच्या नातलगांना भेटण्यासाठी गेला. स्मशानात अंत्यसंस्काराला देखील गेला. पण सेलूचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जात पंचनामा केला असता संशय बळावला. तिथे दारुची बाटली पडलेली होती. बाटलीतून उग्रवास आणि झाकणावरील बारीक छिद्रांमुळे घातपात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तपासाची सूत्रे फिरवत आरोपींना अटक केली.पुढील तपास पोलीस करत आहेत.