Just another WordPress site

शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेची

सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्वाची सुनावणी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत सोमवारचा दिवस अतिशय महत्वाचा ठरणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. आत्तापर्यंत नेहमी पुढची तारीख देण्यात आल्यामुळे उद्या काय होणार याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

GIF Advt

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनसवणी घटनापीठाकडे जाणार की आणखी काय निर्णय होणार हे पहावे लागेल त्याचबरोबर सध्याचे सरन्यायाधीश रमण्णा आपल्या निवृत्तीआधी काही महत्वपूर्ण निकाल देणार का याचेही उत्तर उद्या कळणार आहे. प्रकरण घटनापीठाकडे गेले तर निकाल अधिक लांबण्याची शक्यता आहे.पण अपात्रतेसंदर्भात लवकर निकाल देण्याची मागणी शिवसेनेतर्फे पहिल्यापासून करण्यात आली आहे. यावर उद्या न्यायालय काय बोलणार याचीही उत्सुकता राहणार आहे. त्याचबरोबर मंगळवारी निवडणूक आयोगाचीही सुनावणी होणार आहे त्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार यासाठीही उद्याची सुनावणी महत्वाची असणार आहे. मागील सुनावणीत शिंदे गटाला आपली भुमिका स्पष्टपणे मांडता आली नव्हती त्यामुळे उद्या ते काय युक्तीवाद करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हे प्रकरण जूनपासून न्यायालयात प्रलंबित आहे.सध्या सरन्यायाधीशांच्या तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनुष्यबाण ठाकरेंचा कि शिंदेचा याचा फैसला होणार की हे प्रकरण आणखी लांबणीवर पडतं याची उत्सुकता उद्या असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!