Latest Marathi News
Ganesh J GIF

हॉटेलमध्ये घुसली भरधाव कार,अंगावर काटा आणणारा व्हिडीओ..नक्की बघा

लातूर जिल्ह्यतल्या औसा येथे हायवे क्रमांक ३६१ वर सीएनजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका हॉटेलात भरधाव वेगाने आलेली कार अचानक घुसली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रस्त्यालागत असणाऱ्या हॉटेलमधे काम करणाऱ्या कामगाराचे दोन्ही पाय मोडले.

त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथ उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.या अपघातातील क्रेटा कार हैदराबाद येथून लातूरकडे भरधाव वेगात निघाली होती. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार थेट हॉटेलात घुसली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १४ वर्षीय ओमकार कांबळे याचे दोन्ही पाय तुटले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. तसेच कार मधील दोघं गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कारमधील मृतांमध्ये लातूरचे मसूर टेलर राजासाहेब वाजीद पठाण आणि सोहेल शेख होते. या दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. ते सासरे, जावई असल्याची माहती आहे. या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!