Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार ?

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यात शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालंय. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येतंय. शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत. मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा चंग अजित पवारांनी बांधलाय. त्यामुळं या मतदार संघावरुन महायुतीत स्पर्धा निर्माण झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आत आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटलांवर 2009 आणि 2014 साली मतदारांनी विश्वास टाकला. हॅट्रिक मारलेल्या आढळरावांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या घाटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांच्यासोबत शर्यत झाली. अपेक्षेनुसार कोल्हेंनी बाजी मारली. मात्र आता पुणे जिल्ह्यावर प्राबल्य असणाऱ्या अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पराभूत कऱण्याता निर्णय घेतला आहे. 2009-2014 असे सलग दोन लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय खेचून आणला होता. आता अजित पवारांसोबतच जाऊन पुन्हा शिरुर काबीज करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आढळरावांनी म्हाडाच्या अध्यक्षपदासाठी लोकसभा सोडणाऱ्यातला मी नाही, असं थेट सांगितलं होतं. शिवाय महायुतीत चिन्हाची देवाणघेवाण होते. यापूर्वीदेखील असे प्रकार झाले असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवार गटात जाण्याचे संकेत दिले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!