
सातारा । लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्याच्या दिवसापासून देशात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. दुसरीकडे साताऱ्यात महायुतीत कोणत्या पक्षाकडे उमेदवारी जाणार याची उत्सुकता अद्यापही नागरिकांना आहे. उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र उदयनराजेंचं नाव दोन्ही यादीत जाहीर झालं नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच आता भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन उदयनराजेंच्या भेटीसाठी गेले आहेत
गिरीश महाजन उदयनराजे भोसले यांच्या साता-यातील जलमंदीर येथे पोहोचले आहेत. गिरीश महाजन अचनक उदयनराजे भोसले यांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. उदयनराजे आणि गिरीश महाजन यांच्यात होत असलेल्या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते उमेदवारीच्या मुद्यावरुन आक्रमक झाले होते.
उदयनराजे यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अद्याप त्यांच्या नावाची घोषण न झाल्याने कार्यक्रते नाराज होते. अशातच आता गिरीश महाजन अचानक उदयनराजेंच्या भेटीसाठी साताऱ्यात पोहोचले आहेत. त्यामुळे उदयनराजे यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भेटीत नक्की कशावर होणार चर्चा याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.