Latest Marathi News
Ganesh J GIF

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याची शेतकऱ्यांकडून तोडफोड

थकीत एफआरपी न दिल्याने शेतकरी आक्रमक व्हिडिओ व्हायरल

बार्शी दि २३(प्रतिनिधी)- भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बार्शी  तालुक्यातील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची एका शेतकऱ्याने थकीत बिल न दिल्यामुळे तोडफोड केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून राज्यात पुन्हा एकदा थकीत एफआरपीचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावच्या हद्दीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखाना आहे. या कारखान्याने गाळप केलेल्या उसाची एफआरपी पाच महिने उलटूनही अद्याप देण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या संयम सुटला.त्यातूनच कार्यालय तोडफोडीची घटना घडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कारखान्याजवळ एफआरपी आंदोलन सुरु होते. तेंव्हा एका शेतकऱ्याने थेट कारखान्यात घुसत कार्यालयातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करत आपला संताप व्यक्त केला आहे.इंद्रेश्वर साखर कारखान्याने मागील पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिलेली नाही.

एफआरपीचा मुद्दा कायमच वादात राहिला आहे. अजूनही ब-याच कारखान्यानी रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. बार्डोली तालुक्यातील शेतकरी संतापाचे लोण राज्यभर पसरल्यास सरकारपुढील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!