Latest Marathi News
Ganesh J GIF

भान राखून विचारांची लढाई विचाराने लढू, सोलापुरात खुल्या पत्राची चर्चा ! बघा नेमक काय घडलय ?

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे. सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी सोलापूरची निवडणूक ‘भूमिपुत्र विरुद्ध उपरे’ असे केल्याची चर्चा आहे. राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे की, “सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

तसेच पुढील 40 दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सातपुतेंवर केली आहे. तसेच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवू या आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे. प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे आता खऱ्या अर्थाने सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे. राम सातपुते यांना सोलापूरमधून भाजपची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. सातपुते यांच्या विरोधात पोस्ट देखील केल्या जात आहे. ज्यात ‘चला लागा कामाला, बीडचा पार्सल बीडला परत पाठवूया’ अशा पोस्ट केल्या जात आहे. त्यामुळे सोलापुरच्या निवडणुकीत ‘भूमिपुत्र विरुद्ध उपरे’ असा थेट प्रचाराचा मुद्दा होण्याची शक्यता आहे. तर, याला राम सातपुते समर्थक कसे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेले राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. सोबतच सातपुते हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्याचे देखील बोलले जाते. 2019 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. आता त्यांचा सामना थेट प्रणिती शिंदे यांच्यासोबत होणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!