![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे.अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवसमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे.
दरम्यान, मोहिते पाटलांचा भाज प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळं आता धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत. बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार असल्याचे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले.