Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा मोठा प्लॅन  बघा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात युती आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी घोषित केल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.तसंच प्रकाश आंबेडकर यांनी आपली मराठा समाजाशी चर्चा झाली असून मनोज जरांगे पाटालांचा आपल्याला पाठिंबा असल्याचंही म्हटलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी यावर बोलताना म्हटलं की, आंबेडकर यांच्याशी आमची भेट झाली पण भूमिका काय घ्यायची याबाबत ३० तारखेला निर्णय होणार आहे. कार्यकर्त्यांसोबत गावागावात जाऊन चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणाचा प्रश्न जो उमेदवार सोडवण्याची लेखी बॉण्डवर हमी देईल त्याला उमेदवारी देऊ व त्याच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवमध्ये केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाजातील तरुणांनी लोकसभा उमेदवारीची तयारी केलीय. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एकनिष्ठ राहण्याचे हमीपत्र सुद्धा तयार केले आहे. हे हमीपत्र जरांगे यांच्याकडे पाठवले जाणार असून यातून उमेदवारी निवडली जाईल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलन गावागावात बैठक घेऊन उमेदवाराची चाचपणी करत आहेत.

दरम्यान, नाशिक मध्ये मराठा समजाने तातडीची बैठक बोलावली आहे. नाशिकमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा होताच मराठा समाज एकवटला आहे. भुजबळ नाशिक लोकसभेसाठी उभे राहिले तर मराठा समाज भुजबळच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या भुजबळांना त्यांची जागा दाखवा असा सूर बैठकीत उमटला आहे. मराठा समाजाच्या बैठकीला शिवसेना ठाकरे गटातील नाराज विजय करंजकर देखील उपस्थित.

मनोज जरांगे – पाटील यांच्या आदेशानुसार एक लोकसभा एक अपक्ष उमेदवार उभा करण्याच्या अनुषंगाने वैराग येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. त्यामध्ये चार ठराव मंजूर करण्यात आले. त्यात मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील तो सर्वांनी मान्य करणे. एक लोकसभा एक उमेदवार तसेच ज्यांना जास्तीच्या संख्येने लोकसभेच्या निवडणुकीत उभा रहायचे आहे त्यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!