
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यात शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत. मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा चंग अजित पवारांनी बांधलाय. त्यानंतर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आता शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी थेट लढत होणार आहे. त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी कामाला सुरुवात केली आहे.

अश्यातच आता आढळराव पाटीलांनी कोल्हेंना चंदेरी दुनियेची आठवण करुन देत खडेबोल सुनावले आहेत. अमोल कोल्हे यांना यांच्या चंदेरी दुनियेची सुद्धा आढळराव यांनी खिल्ली उडवली. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका मेळाव्यात ते बोलत होते.कार्यकर्त्यांशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, ‘आम्ही कुठे तरी चंदेरी दुनियेत लोकांना न्यायचं आणि खोटी आश्वासनं द्यायची असा प्रकार होत असल्याचा आरोप आढळराव पाटीलांनी केला. शरद पवारांना आम्ही विसरु शकत नाही वळसे पाटलांसह मला आजही शरद पवारांबद्दल आदर असल्याची भावना आढळराव पाटलांनी व्यक्त केली आहे.

मात्र अमोल कोल्हे शरद पवारांचे नाव घेऊनच प्रचार करताय. शरद पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही. शरद पवारांसोबत निष्ठा ठेवून उभा आहे, असं सांगून मतं मागणार असाल पण शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. आता त्यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत, अशा आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना सुनावले.
शिवाजी आढळराव पाटील यांनी 2004 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना पक्षातून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली.त्यात त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.

