Latest Marathi News
Ganesh J GIF

“आजपर्यंत तुम्ही फक्त साहेबांना आणि मुलीला मतदान केलं, आता..”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली असून, यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली.शरद पवार यांच्या गटाची उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाने देखील सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करत उमेदवारी जाहीर केली.

गेल्या काही दिवसांपासून बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी काम सुरु केल्याचे पाहायला मिळत होते .त्यामुळे बारामतीमध्ये खरच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर राष्ट्रवादीच्या दोन्हही गटांनी बारामतीमधील आपले उमेदवार जाहीर केले. त्यामुळे बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय सामना रंगणार आहे.अश्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन करताना मोठं विधान केल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “आजपर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभा राहिलात, आताही मतदान करताना ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणी मतदान करा, म्हणजे पवारांना मतदान केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल असं अजित पवार म्हणाले.

आतापर्यंत तुम्ही साहेबांना मतदान केलं. त्यानंतर मुलाला म्हणजे मला मतदान केलं. नंतर तुम्ही मुलीला (सुप्रिया सुळे) मतदान केलं. आता सुनेला मतदान करा. म्हणजे पवारांना मतदान केल्या तुम्हाला समाधान मिळेल. जेव्हा मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीत होतो. आता साठी पार केली आहे.त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा याचा विचार केला, मग सुनेत्रा पवारांचे नाव पुढे आलं. आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला. त्यामुळे ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा. असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे , शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे , दिंडोरी मधून भास्करराव भगरे तर नीलेश लंके यांना ​​​​​​​अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!