Latest Marathi News
Ganesh J GIF

गरोदर महिलांचा जीव धोक्यात पोषण आहारात अळ्या , अमोल कोल्हेंनी सरकारला धरलं धारेवर

शिरुर तालुक्यातील आंबळे गावात गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या सापडल्या आहेत. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.सत्ताधाऱ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ निवडणूकीवर असल्यामुळे प्रशासन वाऱ्यावर सोडलं आहे. नेमकं पोषण कोणाचं सुरू आहे हा प्रश्न आहे, गरोदर मतांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यासापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरू आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सत्ताधाऱ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ निवडणूकिवर असल्यामुळे प्रशासन वाऱ्यावर सोडलं आहे. नेमकं पोषण कोणाचं सुरू आहे हा प्रश्न आहे. गरोदर मतांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यासापेक्षा सत्ताधाऱ्यांच्याजवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरू आहे.बाजारातून जुना माल पडलेल्या भावाने उचलून चढ्या भावाने विकायचा अशा कंत्राटदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. बाजारातून एक्सप्राइरी डेड जवळ आलेला खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दराने कंत्राटातून विक्री करायचा, अशी साखळी समोर येतीयेत्यामुळे हे नेमकं पोषण कोणाचं कंत्राटदाराच की गरोदर माता आणि पोटातल्या बाळाचं असा प्रश्न, अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे.

शिरुर तालुक्यातील आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा गरोदर महिलेला दिल्या जाणाऱ्या शिद्यांमध्ये अळ्या व सोनकीडे आढळले आहेत. शासनाचे उद्दिष्ट हे त्या गरोदर मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले राहावे. तसेच त्यांची चांगली काळजी घेण्यासाठीच हा उपक्रम आहे. परंतु शिरुर तालुक्यातील आंबळे येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आहारातील गुळ आणि काजुमध्ये किडे दिसून आले. हाच पोषण आहार गरोदर महिलांना दिल्याचंदेखील समोर आलं आहे. गरोदर महिलांना योग्य पोषण देण्यासाठी ही उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. त्यात असे प्रकार सुरु असेल गरोदर महिलांचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्यदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे परिणामी हे किडे विषारी असतील तर गरोदर महिलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!