Latest Marathi News
Ganesh J GIF

‘नो लंके ओन्ली विखे’ नगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा निलेश लंकेंवर हल्ला, सुजय विखेचा विजय पक्का असल्याचा विश्वास!

सुजय विखे अतिशय चाणाक्ष आणि सक्रीय खासदार आहे. मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभा राहतात हा नगरचा इतिहास आहे. विरोधकांच्या लंकेचं दहन करायचे आहे.आता ‘नो लंके ओन्ली विखे’, ड्रामा करून खासदार होता येत नाही, अशी टीका मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंवर केली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेतून ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, भर उन्हात आपण इथे इतक्या मोठ्या संख्येने इथे सुजय विखेंच्या पाठीशी उभे राहिलात म्हणजे सुजय विखेंचा विजय निश्चित आहे. म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून येथे काम करतोय. लोकसभेत अनेक प्रशांना सुजयने वाचा फोडली आहे.

खरं म्हणजे सुजयचे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचे बीज रोवले आहे. बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्याचा वटवृक्ष केला. आता ती परंपरा सुजय विखे पुढे चालवत आहे. त्यामुळे खऱ्या प्रत्येक घटनेत सुजय विखे हे लोकांसोबत असतात. सुजयला इथल्या सर्व भागाची जाण आहे. या मतदारसंघातले प्रश्न ते हिरीरीने मांडतात. मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभा राहतात हा नगरचा इतिहास आहे. विरोधकांच्या लंकेचं दहन करायचे आहे. आता “नो लंके ओन्ली विखे”, ड्रामा करून खासदार होता येत नाही, अशी टीका त्यांनी निलेश लंकेंवर केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!