Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अबू आझमी करणार प्रवेश? अजित पवारांची ताकद वाढणार

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान अनेक राजकीय नेते पक्षांतर करत आहेत. यातच आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची अबू आझमीसोबत भेट झाली असून येत्या चार ते पाच दिवसांत ते पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आझमी यांच्यावर काही दिवसांपूर्वीच आर्थिक घोटाळ्यांचा आरोप केला होता.भाजपचा एक महत्त्वाचा नेता अबू आजमी यांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी भाजपमध्ये प्रवेश करू शकत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून अबू आझमी समाजवादी पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी आता समाजवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

अबू आझमी यांना विशेषत: मुंबईतील मुस्लिम समाजाचा अबू आझमी यांना पाठिंबा आहे. अशातच जर अबू आझमी राष्ट्रवादीत गेले तर अजित पवार यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. अबू आझमी यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने मुस्लिम मतदारांचाही मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.ही बाब लक्षात घेत स्थानिक मुस्लिम नेतृत्व एनडीएकडे कसे वळवता येतील, अशी रणनीती आखली जात आहे. त्यामुळेच काही दिवसांत राज्यातील विरोधी पक्षांमधील काही आमदार व मुस्लिम नेते हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या मुंबईतील मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघातून ते सलग तीनवेळा निवडून आले आहेत. याशिवाय ते राज्यसभेचे खासदार राहिले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!