
पक्ष म्हणजे चायनाचा माल. चले तो चांद तक … नहीं तो रात तक. भाजपसह महायुतीतील पक्षांवर उत्तम जानकरांची टीका
लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तम जानकर यांनी माढ्यात महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना भावनेच्या भरात आपली चूक झाल्याचं म्हटलं.माढा मतदारसंघाचा डाग माझ्यामुळे लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला होता. आता माढा पुन्हा पवार साहेबांच्या पायावर घालण्यासाठी आपण चालू विमानातून उडी टाकली असंही ते म्हणाले.भावनेच्या भरात आमची चूक झाली होती. १ लाखाचे मताधिक्य देऊन बीड चे पार्सल आमच्यात आणून ठेवलं. पहाटे ३ वाजता पवार साहेबांचे घर गाठलं आणि विधानसभेचे तिकीट घेतले होते. माझ्या घरात पवार साहेबांचा फोटो आहे म्हणून माझी सोलापूर लोकसभेची उमेदवारी कापली गेली असे मला सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला.
भाजपसह महायुतीतील पक्षांवर टीका करताना उत्तम जानकर म्हणाले की, हे पक्ष म्हणजे चायनाचा माल. चले तो चांद तक नाही… नहीं तो रात तक. अशी परिस्थिती आहे. मोहिते पाटील यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी आपण विमानातून उडी टाकली आणि रिक्षा करून पवार साहेबांच्या घरी गेलो. पवार साहेबांच्या घरी जाऊन आपण धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केली. आता आपण धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करू असंही जानकरांनी म्हटलं.माळशिरस तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीवेळीही उत्तम जानकर यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. थेट अजित पवारांवर हल्लाबोल करताना जानकर म्हणाले होते की, मला काही अजून पक्षातून काढलं नाहीय. मी रोज विचारतो मला पक्षातून काढलं का? मी संस्थापक सदस्य असल्यानं मीच अजित पवार यांना काढून टाकू शकतो असंही जानकर म्हणाले होते.