Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्र अशा आत्म्यांना जुमानत नाही; संजय राऊत यांनी कुणावर साधला निशाणा

राज्यातील राजकारण दोन दिवसांपासून ‘आत्मा’मय झाले आहे. आत्मा हा राजकीय सभांमधील परवलीचा शब्द ठरला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात काही आत्मा भटकत असल्याची बोचरी टीका शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली होती.त्यानंतर आज संजय राऊत यांनी सध्या मोदींचा आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे. या भटकणाऱ्या आत्म सारखे इतर पण काही आत्मे भटकत असल्याचा पलटवार केला.राज्यात साडेचारशे वर्षांपासून आत्मे भटकत आहेत. जे महाराष्ट्रचे शत्रू आहेत, औरंगजेब, अफजखान चा आत्मा भटकतोय. जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, ज्यांना महाराष्ट्रने गाडले आहे. असे साडे चारशे वर्षांपासून आत्मे महाराष्ट्रमध्ये भटकटत आहेत, त्यात हा गुजरातचा एक आत्मा आहे,अशी जहरी टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली आहे.

असे कितीही आत्मे भटकत असले तरी अशा आत्म्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्र ढोंग, अंधश्रद्धा, फेकाफेकी, याला कधीही महाराष्ट्रने महत्व दिले नाही. महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले अशा लोकांचा महाराष्ट्र आहे. काल मोदीजी पुण्यात होते तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा साधा उल्लेख तरी केला का? कारण त्यांना डॉ आंबेडकर यांच्यावर राग आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांना संविधान बदलायचे आहे. म्हणून त्यांचे आत्मे महाराष्ट्र मध्ये भटकतायत, पण शIवसेना ठाम पणे उभी आहे, त्याविरोधात संविधान आम्ही बदलू देणार नाहीत, असे ते म्हणाले.

उद्या 1 मे आहे, ज्या 105 हुतात्म्यांनी देशासाठी बलिदान दिले, ते उध्या मोदींना शाप देणार आहेत. कारण मोदी ने जे आतापर्यंत महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे नुकसान केले ते आतापर्यंत कोणी केले नाही. उद्या 105 हुतात्म्यांच्या आत्म्याला सांगू की हे जे महाराष्ट्र द्रोही आत्मे भटकत आहे त्याचा आमही बदला घेऊ, असे राऊत म्हणाले.या देशाची भुताटकी व्हायला वेळ लागणार नाही .तुमच्यासारखा एकच भटकटाय आत्मा बसला पंतप्रधान पदावर तर या राज्याची, देशाची भुताटकी होऊन जाईन.आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत,पंतप्रधान पदासाठी आणि हे लोकशाहीतील चांगले उत्तम उदाहरण आहे. लोक जे स्वीकारतील तो पंतप्रधान होईल, असा टोला त्यांनी लगावला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!