Latest Marathi News
Ganesh J GIF

मोदींनी धमकी, आमिषं दाखवून विरोधकात पाडली फूट; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर गंभीर आरोप

लोकसभा निडवणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. त्यापूर्वी इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपसह महायुतीवर तोफ डागली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला.इंडिया आघाडीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात मोदींनी धमकी, आमिषं दाखवून विरोधक फोडल्याचा दावा केला. मोदी जनतेला भडकविण्याचे काम करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

मोदी सरकार देशात विश्वासघातचे राजकारण करत असल्याचा आणि घटनात्मक संस्थेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप खरगे यांनी केला. मोदी सरकार धमकी,आमिषं आणि ब्लॅकमेल करुन विरोधकांना फोडण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मोदींवर केला. विरोधकांमध्ये फुट पाडण्यात येत आहे.जो मुळ पक्ष आहे. तो हिसकविण्याचे प्रकार देशात सुरु आहे. मुळ पक्षाचे निशाण, पक्ष चोरी वाढली आहे. तर भाजपला समर्थन देणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या गटांना हे पक्ष चिन्ह, निशाण आणि नाव देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला. सर्व गोष्टी मोदींच्या इशाऱ्यावर होत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानानं असं भडकवण्याचं काम केले नव्हते. तोडफोडीचे काम केले नव्हते, असा घणाघात त्यांनी केला.

देशातील अनेक घटनात्मक संस्था मोदींच्या इशाऱ्यावर चालतात. मोदी जे म्हणतात तेच होत आहे. पण या निवडणुकीत तसे होणार नाही. कारण जनतेची ही लढाई, जनता सुद्धा लढत असल्याचे खरेग म्हणाले. जनता जिंकणार आहे. भाजप सरकारच्या कारनाम्यावर जनता नाराज आहे. हे सरकार लोकशाहीच्या बाता मारते, पण त्यावर अंमल करत नाही. दोन वर्षांपासून महापालिका निवडणूक झाल्या नाहीत, हीच मोदींची लोकशाही असल्याचा टोला खरगे यांनी लगावला.
मोदींची तोडफोड नीती केवळ महाराष्ट्रात झाली असे नाही. पहिला वार झाला कर्नाटकमध्ये, मणिपूर, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात याशिवाय इतर अनेक राज्यात हीच नीती राबविल्या जात आहे. त्याविरोधात इंडिया आघाडी जोरदारपणे लढत असल्याचे खरगे म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!