
ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही,…त्यांचा संबंध आतां हिरव्याशी ; गोपिचंद पडळकरांची सडकून टीका
धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी, ‘ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही.त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होईल, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.आमदार गोपीचंद पडळकर,”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा सुपुत्र इतक्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं. भगवा आमचा स्वाभिमान आहे. ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही. त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे. याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर होईल.” असे म्हणाले.
पुढे त्यांनी “देशात आणि राज्यात जे लोकं मोदींना विरोध करत आहेत. त्यांचा अवाका किती आहे? त्यांना खूप मर्यादा आहेत. ज्या पद्धतीनं डबक्यातले बेडूक डराव डराव करतात, त्याच पद्धतीनं ही लोकं महाराष्ट्रात बोलत आहेत. मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे. यांना प्रचंड मर्यादा आहेत. यांच्या नादाला लागून काही उपयोग नाही. चार जूननंतर यांची तोंडं काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत.”, असंही वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.