
अण्णा हजारे हा विषय आता संपला आहे.’ अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. दरम्यान या टीकेला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.मी कुठल्याही पक्ष पार्टीचा माणूस नाही, मी समाज हितासाठी काम करतो त्यामुळे मला संपवण्याचा प्रश्नच येत नाही, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, ‘दहा-बारा वर्षांनी ते का बोलले मला माहीत नाही, परंतु कुणाचे भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढणं यात काही चुकीचं नाही, मला जे दिसलं त्यावर मी बोलत गेलो. आता बोलत नाही कारण माझं वय 88 वर्ष आहे, पण त्यांना आज अचानक कशी जाग आली हे मला माहिती नाही’ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अण्णांबद्दल आम्हाला खूप आदर आहे, परंतु 2014 पूर्वी टुक वाजलं तरी अण्णा आक्रमकपणे आंदोलन करत होते, मात्र आता देशामध्ये बॉण्ड घोटाळा मणिपूर प्रकरण महाराष्ट्रामध्ये ॲम्बुलन्स घोटाळा या प्रश्नांवर अण्णांनी कधी बोलले नाही किंवा आंदोलन केलं नाही , यामुळे सोयीचे समाजकारण हे बरोबर नाही’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.