Latest Marathi News
Ganesh J GIF

पाकिस्तानी सैनिकांनी लावलेल्या गाण्यावर भारतीय जवानांचा डान्स

तणावग्रस्त सीमेवरील तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

दिल्ली दि २७ (प्रतिनिधी)- भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमीच तणाव पहायला मिळत असतो पण त्याच सीमेवर अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानी सैन्यांनी सिद्धू मूसेवालाचं गाण स्पीकरवर लावलं लावल्यानंतर, त्या गाण्यावर भारतीय जवानांनी ताल धरल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची अलीकडेच काहीजणांनी गोळ्या घालून हत्या केली. त्याची गाणी सीमेपलिकडे पाकिस्तानातदेखील ऐकली जात आहेत. या व्हिडिओत व्हिडीओ क्लिपमध्ये पाकिस्तानी सैनिक स्पीकरवर मूसवालाचे ‘बंबीहा बोले’ हे गाणं वाजवताना दिसत आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान गाण्याचा आनंद लुटत आहेत. संबंधित गाण्यावर भारतीय जवानांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भारत-पाकिस्तानसीमेवरील एका सीमा चौकीवर रेकॉर्ड करण्यात आला आहे. ज्याठिकाणी स्पीकर लावला आहे, तिथे पाकिस्तानी झेंडादेखील दिसत आहे. भारतीय जवानांच्या डान्सला पाकिस्तानी सैन्यांनेही दाद दिली आहे.

सीमेवरील हा अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. भारतीय पोलीस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी ट्विटरवर हा शेअर केला आहे. सीमेवरील जवानांना नेहमीच सतर्क रहावे लागते. त्यांना विरंगुळ्याचे क्षण फारच कमी येतात. त्यामुळे या व्हिडिओची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!