Latest Marathi News
Ganesh J GIF

निलेश लंकेंसह 12 खासदारांनी घेतली हिंदी, इंग्रजीत शपथ

अठराव्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (24 जून) सुरुवात झाली असून 03 जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी सर्व खासदारांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे.यावेळी राज्यातील महायुतील आणि महाविकास आघाडीच्या 48 पैकी 36 खासदारांनी मातृभाषा मराठीतून शपथ घेतली, तर काहींनी इंग्रजी आणि हिंदी भाषेतून शपथ घेतली. या शपथविधी सोहल्यादरम्यान अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांची चर्चा होताना दिसत आहे.

आज संसदेत राज्यातील 9 खासदारांनी हिंदी आणि 3 खासदारांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. या शपथविधीवेळी सोहळ्यावेळी निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. अहमदनगर लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना शिक्षण आणि इंग्रजीवरून हिणवले होते. मात्र आज त्यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेत, सुजय विखेंना दाखवून दिले आहे की, ते सुद्धा काही कमी नाही.

काँग्रसेच्या धुळे येथील शोभा बच्छाव, अमरावती येथील बळवंत वानखेडे, चंद्रपूर येथील प्रतिभा धानोरकर, जालना येथील कल्याण काळे, नांदेड येथील वसंत चव्हाण, मुंबई उत्तर मध्य येथील वर्षा गायकवाड, लातूर येथील शिवाजी कालगे, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज, भाजपाच्या सातारा येथील छत्रपती उदयनराजे भोसले, पुणे येथील मुरलीधर मोहोळ, रावेर येथील रक्षा खडसे, जळगाव येथील स्मिता वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धा येथील अमर काळे, दिंडोरी येथील भास्कर भगरे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), बीड येथील बजरंग सोनावणे, बारामती येथील सुप्रिया सुळे, शिरूर येथील अमोल कोल्हे, माढा येथील ध्यैर्यशील मोहिते पाटील आणि अजित पवार गटाच्या रायगड येथील सुनील तटकरे यांनी मराठीतून शपथ घेतली.

शिंदे गटाच्या बुलढाणा येथील प्रतापराव जाधव, छत्रपती संभाजीनगर येथील संदीपान भुमरे, कल्याण येथील श्रीकांत शिंदे, ठाण्यातील नरेश म्हस्के, मुंबई उत्तर पश्चिम येथील रवींद्र वायकर, मावळ येथील श्रीरंग बारणे, हातकणंगले येथील धैर्यशील माने आणि ठाकरे गटाच्या यवतमाळ-वाशिम येथील संजय देशमुख, हिंगोली येथील नागेश पाटील आष्टीकर, परभणी येथील संजय जाधव, नाशिक येथील राजाभाऊ वाजे, ईशान्य मुंबई येथील संजय दिना पाटील, दक्षिण मध्य मुंबई येथील अनिल देसाई, दक्षिण मुंबई येथील अरविंद सावंत, शिर्डी येथील भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिव येथील ओमराजे निंबाळकर या खासदारांनी मराठीतून शपथ घेतली.

काँग्रेसच्या सोलापूर येथील प्रणिती शिंदे, नंदूरबार येथील गोवाल पाडवी, रामटेक येथील श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया येथील प्रशांत पडोले, भाजपाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील नारायण राणे, अकोला येथील अनुप धोत्रे, उत्तर मुंबई येथील पीयूष गोयल, नागपूर येथील नितीन गडकरी आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी हिंदीतून शपथ घेतली. तर काँग्रेसच्या गडचिरोली-चिमूर किरसान नामदेव, भङाजपाच्या पालघर येथील हेमंत सवरा आणि शरद पवार गटाच्या अहमदनगर येथील निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!