Latest Marathi News
Ganesh J GIF

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘या’ निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ ; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर कला ओझा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी हा राजीनामा दिला आहे.दरम्यान कला ओझा यांनी राजीनामा दिल्यानंतर अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही, त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.

पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत माजी महापौर कला ओझा यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. कोणत्याही दबावाने आपण हा राजीनामा देत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले असले तरी त्यांचा फोन संध्याकाळनंतर बंद होता. आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयकाची जबाबदारी त्यांच्यावर होती. ओझा या चंद्रकांत खैरे यांच्या गटातील विश्वासू पदाधिकारी होत्या.

काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गटातील महिला आघाडीप्रमुख प्रतिभा जगताप यांनी देखील राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता कला ओझा यांनी राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!