मुंबई दि ३१ (प्रतिनिधी) – काय झाडी काय डोंगार काय हाटील एकदम ओक्के या डायलाॅगमुळे चर्चेत आलेले आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराने जोरदार टिका केली आहे. त्यामुळे विधान भवनात रंगलेला राष्ट्रवादी विरूद्ध शिंदे गटाचा सामना आता राज्यात होण्याची शक्यता आहे.
शहाजी पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होणार, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता अमोल मिटकरींनी त्यांच्या शैलीत उत्तर देत शहाजी पाटलांवर पलटवार केला आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर आहेत, अशी बोचणारी टीका त्यांनी शहाजी पाटलांवर केली आहे.मिटकरी म्हणाले “सध्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. शिंदे गटाचे जॉनी लिव्हर, या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. शिंदे गटात तुम्ही सध्या कितीही डायलॉगबाजी केली. तरी, तुम्हाला कॅबिनेट तर सोडा साधं राज्यमंत्री पदही भेटणार नाहीये. असा टोलाही मिटकरी यांनी लगावला आहे.
शिंदे गटातील बंडखोर आमदार देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचं मिटकरी म्हणाले आहेत.शिवसेनेचे बंडखोर राष्ट्रवादीत आणण्यासाठी राष्ट्रवादीने प्लॅन आखल्याच्या चर्चा सुरु आहे.