Latest Marathi News
Ganesh J GIF

वनराज आंदेकर खूनप्रकरणी नवीन अपडेट समोर;आणखी दोघांना अटक, आरोपींकडून ८ पिस्तूल, १३ काडतुसे जप्त

पुणे  – पुण्यातील नाना पेठ येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. रविवारी रात्री नऊ वाजता दहा ते बारा जणांनी मिळून त्यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केली आहे. या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे.या खून प्रकरणात पसार झालेल्या दोन जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

वनराजआंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून आठ पिस्तूल, १३ काडतुसे, सात दुचाकी, मोटार जप्त करण्यात आली आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती, दीर, भाचा यांच्यासह इतरांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हत्या करण्यासाठी कोयते, पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारे याला देखील अटक झाली आहे.

त्यानंतर आता या घटनेनंतर पसार झालेला आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने आणि खंडणी विरोधी पथकाने काल (बुधवारी) रात्री उशीरा अटक केली आहे.सदरची कारवाई युनिट १ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  उपनिरीक्षक अविनाश लोहटे, सहाय्यक पोलीस फौजदार मकरे, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व निलेश साबळे यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!