रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी दोनशे रुपये मागितल्याच्या रागातून विष्णू बुद्धिवंत (३०) या रिक्षाचालकावर त्याचाच मित्र जयेश पाटील (३४) याने एका लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली. पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी दिली.
विष्णू हा टाटा प्लेय फायबर या कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरीला आहे. त्याच्याच घराशेजारी राहणारा जयेश कोरडे (३४) याची आणि विष्णू या दोघांची चांगली मैत्री आहे. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले.
त्यानंतर रिक्षामध्ये गॅस टाकण्यासाठी पाटील याच्या वडिलांकडे दोनशे रुपयांची मागणी विष्णू याने केली. तेंव्हा आपल्या वडिलांकडे दोनशे रुपयांची मागणी का केली, यावरून विष्णू आणि जयेश यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी जयेश याने विष्णू याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला.