मंत्रालयात मोठी खळबळ ! नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयाच्या छतावरून मारल्या उड्या, नेमकं घडलं काय?
आदिवासी आरक्षणात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये अशी मागणी करत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्यासह इतर आमदारांनी मंत्रालयातून जाळीवर उड्या मारल्या आहेत त्यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
नरहरी झिरवाळ हे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते, मात्र त्याठिकाणीही त्यांची भेट होऊ शकली नाही, असे सांगण्यात येत आहे. यानंतर ते आज पुन्हा मंत्रालयात पोहोचले, तिथे त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. या रागातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. नरहरी झिरवाळ यांच्यानंतर इतर काही आदिवासी आमदारांनीही उडी घेतल्याचे दिसत आहे. यामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली होती. यावेळी पोलिसांनी सर्वांना जाळ्यातून बाहेर काढले.
धनगर समाजाच्या आरक्षणावरून आंदोलन करणारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ मंत्रालयाच्या छतावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र उडी मारल्यानंतर झिरवळ सुरक्षा जाळ्यात अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करताना त्यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारली. यानंतर त्यांना पोलिसांकडून बाहेर काढण्यात आले. यावेळी मीडियाशी संवाद साधतांना नरहरी झिरवाळ यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.